पुण्यात दोन ठिकाणी टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

लष्कर आणि ओैंध भागातील घटना

marathinews24.com

पुणे – टोळक्याने वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविल्याची घटना लष्कर आणि ओैंध भागात घडली. या प्रकरणी पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. लष्कर भागातील पूना काॅलेजसमोरील गल्लीत वाहनांची तोडफोड करण्याची घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी रुद्र शिंदे, प्रथमेश, यश खरारे (रा. हरकानगर, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लष्कर भागात राहायला आहेत.

पुणे विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (३० ऑगस्ट) रात्री साडेनऊच्या सुमारास पूना काॅलेजसमाेरील गल्लीत आले. चित्रगुप्त अपार्टमेंट परिसरातील वाहनांची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. सहायक फौजदार बरडे तपास करत आहेत. ओैंध भागात टोळक्याने दहशत माजवून मोटारीसह दुचाकींची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (१ सप्टेंबर) मध्यरात्री घडली. याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओैंध भागातील टेरेसा रस्त्यावर लावलेली मोटार, तसेच दुचाकींची मध्यरात्री लाकडी दांडक्याने तोडफोड केल्याची घटना घडली. तोडफोड करुन टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×