पुणे विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त

चौघांना अटक, गांजाची २६ पाकीटे सापडली

marathinews24.com

पुणे – बँकॉकमधून पुण्यात होणार्‍या कोट्यावधी रूपयांची गांजा तस्करी रॅकेटचा डाव कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने उघड केला आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांकडून १३ किलो ७२५ ग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. याप्रकरणात मुंबई, ठाणे, वलसाड आणि पालघर येथील चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून गांजाची २६ गांजाची पाकीटे जप्त केली आहेत.

तडीपारीचा आदेश भंग केला, दोघा गुंडांना पकडले – सविस्तर बातमी

आलिया इलियास अन्सारी (वय २४), मोहम्मद कैफ अन्सारी (वय २३, सोनाजीनगर, मुंब्रा), जहिदहुसेन शेख (वय २९, रा. किल्ला परडी, वलसाड, गुजरात) अणि झैबुनिसा अमिन शेख (वय ४५, रा. धानानी नगररोड, भोईसर ईस्ट, पालघर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कस्टमच्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने बँकॉकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या आलिया इलियास अन्सारी, मोहम्मद कैफ अन्सारी, आणि जहिदहुसेन शेख यांच्याकडे संशयास्पद पिशव्या आढळल्या. स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून वास येत असल्याने पथकाने तपासणी केली असता व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले. त्यातील हिरवट रंगाचे सुकी वस्तू सल्याचे दिसून आली. त्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पॅकेट्सचे वजन १३ किलो ७२२ ग्रॅम असल्याचे स्पष्ट झाले. आलिया अन्सारीने चौकशीत सांगितले की, विमानतळाबाहेर त्यांचा हँडलर म्हणून जैनबुनीसा शेख थांबलेली आहे. कस्टम विभागाने तात्काळ त्या महिलेला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. चारही आरोपींना कस्टम अधिकार्‍यांनी अटक करून न्यायालयात हजर केले.

चारही आरोपींविरोधात एनडीपीएसच्या विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी युक्तीवाद केला की, आरोपींकडे सापडण्यात आलेली गांजाचे वजन हे व्यावसायीक असून त्याची आंतरराष्ट्रीय बजारात कोट्यवधींची किंमत आहे. हा गांजा नेमका कोठे जाणार होता, तो कोठे पुरविण्यात येणार होता. याचा तपास बाकी आहे..हे आंतरराष्ट्रीय रॅकेट वाटत असल्याने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली. प्राथमिक चौकशीत हे एक आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपास कस्टम विभाग करत आहे. गुन्ह्याचा तपास कस्टम विभागाच्या एअर इन्टेलिजन्स विभागाचे प्रिंस कुमार करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×