Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

घरासमोर उभा केलेला १२ चाकी ट्रक पळविला

वाघोलीतील घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असताना चोरट्यांनी चक्क घरासमोर लावलेला बारा चाकी ट्रकच पळवून नेल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ट्रक मालकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडी करणार्‍या चोरट्याला बेड्या, ९ लाखांचा ऐवज जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. ते वाघोलीतील विठ्ठलवाडी भागात राहायला आहेत. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी घरासमोर बारा चाकी ट्रक लावला होता. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करुन बारा चाकी ट्रक चोरून नेल्याची घटना बुधवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री घडली. सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार व्यावसायिक घरासमोर आले. तेव्हा घरासमोर लावलेला ट्रक जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पसार झालेल्या ट्रक चोरट्याचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी तक्रारदार व्यावसायिकाचे घर आणि नगर रस्ता भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चारचाकी वाहनांच्या तुलनेत शहरातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातून दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जातात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×