Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

घरफोडी करणार्‍या चोरट्याला बेड्या, ९ लाखांचा ऐवज जप्त

काळेपडळ पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – सोसायटीतील सदनिका फोडून ऐवजाची चोरी करणार्‍या चोरट्याला काळेपडळ पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून यावेळी 9 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुस्तफा शकील अन्सारी (वय ४१, रा. जवाहरगंज, कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.पिसोळी येथील बंका सफायर सोसायटीमध्ये चोरी झाली होती याबाबत काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यात महिलासह अल्पवयीनांवर अत्याचारांच्या घटनांत वाढ – सविस्तर बातमी

पोलिस अमंलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले, महादेव शिंदे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना घरफोडीबद्दल माहिती मिळाली त्यानुसार अज्ञात चोरट्याचा शोध घेत अतसना सोसायटीच्या गॅलरीमध्ये त्यांना रक्ताचे डाग पडलेले दिसले. लागलीच ठोंबरे यांनी फॉरेन्सिक पथकाला बोलवून घेतले. यावेळी रक्ताचे नमुने जमा करण्यात आले. तर सोसायटीच्या परिसरातील ७२ सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातील काही फुटेजमध्ये आरोपी हा मोबाईलवर बोलत असल्याचे आढळून आले. त्यानंतर परिसरतील मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यावेळी संबधीत चोरटा हा कोंढवा परिसरात असलयाचे समजले. लागलीच पथकाने त्याला कोंढवा येथून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने , दुचाकी गाडी, मोबाईल फोन असा ९ लाख २२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे निरीक्षक अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×