Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात महिलासह अल्पवयीनांवर अत्याचारांच्या घटनांत वाढ

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्थेच्या अहवालावरून ही बाब उघडकीस

marathinews24.com

पुणे – शहरात महिला आणि अल्पवयीनांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्थेच्या (एनसीआरबी रिपोर्ट २०२३) अहवालावरून ही बाब उघडकीस आली आहे. या अहवालात २०२३ मध्ये घडलेल्या देशभरातील प्रमुख शहरांतील गंभीर गुन्ह्यांची संख्या, तुलनात्मक वाढ याबाबतचा आढावा घेण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांच्या जावयाने ड्रग्ज घेतले नव्हते; प्रांजल खेवलकराचा ड्रग अहवाल नेगेटिव्ह – सविस्तर बातमी

पुण्यात २०२१ मध्ये ९ हजार ५११, तर २०२२ मध्ये ११ हजार ७४ गुन्हे दाखल झाले. २०२३ मध्ये १२ हजार ५४२ गुन्हे दाखल झाले. २०२२ मध्ये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण विचारात घेता २०२३ मध्ये गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात १६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये २३ टक्क्यांहून अधिक वाढ, तसेच अल्पवयीनांवर अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पुणे पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यांचा तपास केल्यावर आरोपीविरुद्ध पुरावे संकलित करून न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात येत आहे. मुदतीत आरोपपत्र दाखल करण्यात पुणे पोलीस दल हे देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोची, कोलकातानंतर पुणे पोलिसांकडून न्यायालयात वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे ‘एनसीआरबी २०२३’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ

देशभरात २०२३ मध्ये प्रमुख शहरांमध्ये ८६ हजार ४२० सायबर गुन्हे दाखल झाले. २०२२ च्या तुलनेत हे प्रमाण ३१.२ टक्क्यांनी वाढले आहे. २०२२ मध्ये ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल झाले हाेते. पुणे शहरात सायबर गुन्हेगारांचा विळखा घट्ट होत चालला आहे. २०२१ मध्ये २२५, २०२२ मध्ये ३५७ आणि २०२३ मध्ये ४८७ सायबर गुन्हे दाखल झाले.ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाचे आमिष (ऑनलाइन टास्क), शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष, तसेच कारवाईची भीती दाखवून फसवणूक (डिजीटल ॲरेस्ट) करण्यात येत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×