Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

एकनाथ खडसे यांच्या जावयाने ड्रग्ज घेतले नव्हते

प्रांजल खेवलकराचा ड्रग अहवाल नेगेटिव्ह

marathinews24.com

पुणे – शहरातील खराडीमध्ये ड्रग पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक झाली होती. मात्र नुकताच याप्रकरणात आरोपींच्या ड्रग सेवनचा फॉरन्न्सिक अहवाल पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामध्ये प्रांजल यांचा ड्रगचा अहवाल नेगेटिव्ह आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. जुलैच्या महिना अखेरीस खराडी येथील हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून कारवाई केली होती.

पुण्यात केली चांदीची चोरी, आरोपीला उत्तर प्रदेशातून बेड्या – सविस्तर बातमी

पार्टीत अमली पदार्थ, दारु, हुक्काचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ, हुक्का पात्र, १० मोबाइल , सुगंधी तंबाखु, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला होता. मात्र प्रांजल खेवकलकर यांच्या रक्तात ड्रगच आढळले नसल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्सचं सेवन केले नसल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते. काही दिवसांपूर्वी हे फॉरेन्सिकचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×