Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

सोसायटीच्या आवारात दुचाकी पेटवून दिली

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सोसायटीच्या आवारात लावलेले दुचाकी पेटवून देण्यात आल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी एका तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी राजकमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रस्ता) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लष्करासाठी साहित्य पुरविण्याच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिचे पती वारजे-एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहेत. महिलेच्या पतीने सोसायटीच्या आवारात दुचाकी लावली होती. आरोपी सुतारने रविवारी मध्यरात्री तक्रारदार महिलेच्या पतीची दुचाकी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिली. प्राथमिक चौकशीत आरोपीने वादातून दुचाकी पेटवून दिल्याची माहिती तपासात मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.

विश्रांतवाडीतील धानोरी भागात एका सोसायटीत तरुणासाेबत वाद झाल्यानंतर त्याची दुचाकी पेटवून देण्याची घटना नुकतीच घडली होती. दुचाकीला आग लागल्यानंतर सोसायटीतील अन्य वाहनांना झळ पोहोचली होती .या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×