मॉर्निंग वॉक करणाऱ्याला कार चालकाने उडवले

“कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्याचा मृत्यू” पुण्यातील उंड्री परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे- भरधाव वाहन चालकाने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एकाला दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा मृत्यू झाला. हा अपघात उंडीतील न्याती इस्तबान सोसायटी जवह सोमवारी सकाळी घडला. सुजीतकुमार सिंह (वय ४९) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. सुजीत हे रोज सकाळी मॉर्नींग वॉकससाठी बाहेर पडत होते. सोमवारी ते नेहमी प्रमाणे चालण्यासाठी बाहेर पडले असता भरधाव वेगातील कार चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अनैतिक संबंधात पतीचा अडसर, प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून – सविस्तर बातमी

याबाबतचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार मसोर आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाउंट पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्यांनी या अपघाताच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्राथमिकता देण्याची मागणी केली आहे. तेथील नागरिकांच्या सुरक्षेबाबत आणि परिसरात उद्यान व्हावे यादृष्टीने त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top