Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली नसरापूर घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेटनसरापुरात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी – डॉ. नीलम गोऱ्हेपुण्यात तब्बल २८ लाखांची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातसत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीने व सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची गरज‘जनगणना २०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारबुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘धम्म पहाट’ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादभोर तालुक्यात बालिकेवर अत्याचार करून खूनलाच मागितल्यापकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकदारू पिण्याच्या वादातून मजुराच्या डोक्यात दगड घालून खून“संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा गौरव: संघर्षाने उभारलेला हे राज्य, आजची वास्तविकता!” – विशेष लेख

सराफाची फसवणूक केली, पुणे पोलीस दलातील हवालदाराविरुद्ध गुन्हा

उदारी सोन्याचे पैसे परत न केल्याप्रकरणी पोलीस हवालदार विरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ओळखीतील सराफाकडून उधारीवर घेतलेल्या ८ लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिन्यांचे पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस हवालदाराविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप, तसेच त्याची पत्नी अश्विनी (दोघे रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. सराफ व्यावसायिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बस प्रवाशाकडून पावणे आठ कोटींचे क्रिस्टल मेथ जप्त – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिकाची ओैंध परिसरात सराफी पेढी आहे. सराफ व्यावसायिक भवानी पेठेतील एका सोसायटीत राहायला आहे. जगताप हा पोलीस दलात असल्याने सराफाची त्याची ओळख होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जगताप आणि त्याच्या पत्नीने सराफी पेढीतून ८ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. उधारीवर खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे नंतर परत करतो, असे जगतापने सराफ व्यावसायिकाला सांगितले होते.

सराफ व्यावसायिकाने जगताप याच्याकडे उधारीवर खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे परत मागितले. तेव्हा जगतापने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक करांडे तपास करत आहेत.

यापूर्वी जगतापने भवानी पेठेतील सराफ व्यावसायिकाकडून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख असल्याची बतावणी करुन त्याच्याकडून दागिने खरेदी केले होते. ही बाब संबंधित सराफ व्यावसायिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर जगतापला याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.

जगतापने ओळखीतील महिलेकडून ७३ तोळ्यांचे दागिने्, तसेच तिच्या पतीकडून १७ लाख रुपयांची रोकड बतावणी करुन घेतली होती. मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने सांगितले होते. पैसे आणि दागिने परत करतो, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याने दागिने, पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक केल्याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात जगतापविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस दलात झालेली शिक्षा लपविण्यासाठी जगतापने पोलीस आयुक्तालायील लिपिकाशी संगनमत करुन सेवा पुस्तिकेतील पान फाडून तेथ दुसरे पान चिटकविल्याच्य आरोपावरुन जगताप याच्यासह बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जगतापसह पोलीस आयुक्तालयातील लिपिकाविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जगताप याला याप्रकरणात अटक करण्यात आली होती.

पर्वती दर्शन भागात तरुणाचा खुनाचा प्रयत्न

किरकोळ वादातून तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना पर्वती दर्शन भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

आदेश संजय काळे (वय ४१, रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अमित काळे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी घरातून निघून गेली होती. मुलीला पळून जाण्यास आरोपी आदेश काळेने मदत केल्याचा संशय महिलेला होता. याबाबत महिलेचा पुतण्या अमितने आरोपी आदेशला जाब विचारला होता. १६ जुलै रोजी त्यांच्यात वाद झाला. वादातून आदेशने अमितच्या डाेक्यात सिमेंटचा गट्टू मारला. मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आदेशला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक नामदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×