भांड्याचा वाद जीवावर बेतला, दाम्पत्याने केला खून

भांड्याचा वाद जीवावर बेतला, दाम्पत्याने केला खून

वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – नातलगांकडे ठेवलेल्या संसारपयोगी भांड्याच्या वादातून एकाचा खून करण्यात आला आहे. ही घटना १६ फेबु्रवारीला वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी दाम्पत्याला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. भास्कर मोहन राठोड (वय ५८ रा. कोलदंडीता जांब, िंजतुर, परभणी ) असे खून झालेल्याचे नाव आहे. आनंद रवींद्र वर्मा (वय २६) आणि शिला आनंद वर्मा (वय २४ दोघेही रा. आव्हाळवाडी, हवेली )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

भरदिवसा कोथरूडमध्ये घरफोडी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर राठोड हे मूळचे परभणी जिल्ह्यातील जिंतुर गावातील रहिवाशी होते. कामानिमित्त ते काही महिन्यांपासून वाघोलीतील आव्हाळवाडीत राहायला होते. त्यांच्या शेजारी वर्मा दाम्पत्यही राहत आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी भास्कर यांनी संसारपयोगी भांडी वर्मा दाम्पत्याकडे ठेवायला दिली होती. १६ फेबु्रवारीला त्यांनी भांडी परत मागितली. त्याच रागातून दाम्पत्याने भास्कर यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या पोटात, पाठीत, तोंडावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे भास्कर हे गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शहादेव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×