पुण्यात पैशाची बॅग हिसकावणार्या टोळीला अटक; आंबेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेने केली अटक
marathinews24.com
पुणे – मित्रानेच दिली खबर अन लुटली ४० लाखांची रोकड…व्यावसायिकाकडील तब्बल ४० लाख रूपये असलेली पैशाची बॅग हिसकावून जबरी चोरीच्या गुन्हयातील आरोपींना आंबेगाव पोलिसांसह गुन्हे शाखेने अटक केले आहे. तक्रारदारासोबत असलेल्या मित्रानेच खबर देउन संगनमताने लुटीचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांकडून पाच मोबाईल, ९ लाख ३५ हजारांची रोकड, मोटार, नंबर प्लेट जप्त केल्या आहेत. प्रदिप रामदास डोईफोडे (रा.वरद हाईट्स, फ्लॅट नं. १११, इंगळेनगर, भुगाव) आणि मंगेश दिलीप ढोणे (रा. रामलिंगनगर, येडशी, जि.धाराशिव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. अभिजीत विष्णु पवार (रा. धाराशिव) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
७५ व्या वर्षी कमाईची हाव सुटली; सायबर चोरट्यांनी ३७ लाखांना टोपी घातली – सविस्तर बातमी
तक्रारदार पवार यांचा धाराशिवमधील येडशी गावात श्री गणेश ट्रेडर्स अॅन्ड पत्रा डेपोचा व्यवसाय आहे. ते पुण्यामध्ये पत्रा स्टीलचे साहित्य पुरवठ्याचे काम करतात. ते १५ जुलैला बांधकाम व्यावसायीकाकडे मालाचे पैसे घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे ४० लाख रुपयांची रोकड बॅगेमध्ये होती. पवार हे एक्सेला प्लाझा बिल्डींग, बाबजी पेट्रोलपंप आंबेगाव याठिकाणी मालाच्या बिलाच्या पैशाबाबत विचारणा होते. त्यावेळी त्यांनी पैशाची बॅग मित्र मंगेश ढोणे यांच्याकडे दिली होती. ते दोघे बाबजी पेट्रोलपंपाजवळुन कंपनीच्या ऑफिसमध्ये पायी चालत जात असताना त्यांच्याजवळ मोटार थांबली. गाडीतून दोघांना उतरून मंगेशकडील पैशांची बँग हिसकावून नेली. यावेळी पवार यांनी संबंधित गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चालकाने त्यांच्या तोंडावरत ठोसा मारल्याने ते खाली पडले.
पैशांची बॅग घेउन मोटारीतून आरोपी नवले ब्रीजच्या दिशेने पसार झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार वाहनाचा क्रमांक (एमएच १२ डब्ल्यू ई ००८५) शोधून काढला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींना खंडोबा मंदिर रोड, भुगावमधून ताब्यात घेतले. तक्रारदार पवार यांचा मित्र मंगेश ढोणे यानेच आरोपी प्रदिप रामदास डोईफोडे यांना पैशांची माहिती देउन गुन्हा केल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा अपर आयुक्त संजय बनसोडे, उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, अंजुम बागवान, वरिष्ठ निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, एपीआय अमोल रसाळ, आशिष कवठेकर, उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, गणेश दुधाने, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, स्मिता पवार, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, पोलीस अंमलदार आबासो खाडे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवा पाटोळे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, राजेश टेकावडे, हरिष गायकवाड, ओंकार कुंभार, अमोल सरडे पवन भोसले यांनी केली.