Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

मॉरिशसमध्ये होणार मराठी अस्मितेचा जागतिक जयघोष

मॉरिशसमध्ये होणार मराठी अस्मितेचा जागतिक जयघोष

आंतरराष्ट्रीय सांगीतिक-सांस्कृतिक सोहळा “मोगरा फुलला” – अभिमानाचा उत्सव

marathinews24.com

पुणे – जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी मराठी भाषा दिन अभिमानाने साजरा केला जातो. केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा अभिमान अधिकच वृद्धिंगत झाला आहे. या ऐतिहासिक गौरवाचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या उद्देशाने मॉरिशस  येथे २७ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२६ या कालावधीत “मोगरा फुलला” या भव्य आंतरराष्ट्रीय सांगीतिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महंमदवाडी भूखंड संपादन प्रकरणी तक्रार, ५५ कोटींच्या टीडीआर प्रस्तावावर स्थगितीची मागणी – सविस्तर बातमी 

हा कार्यक्रम मॉरिशसमधील प्रतिष्ठित सर्ज कॉन्स्टँटिन थिएटर येथे पार पडणार असून, याबाबतची माहिती  स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन चे अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रबोधन परिवाराच्या सन्मिता धापटे-शिंदे, गणेश शिंदे,  फाउंडेशनचे सचिव प्रसादराजे भोपळे  आदि मान्यवर उपस्थित होते.

हा सोहळा स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाउंडेशन आणि प्रबोधन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालय व मॉरिशस कला व सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे. यासोबतच मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी स्पीकिंग युनियन आणि क्रॉसवेज इंटरनॅशनल यांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे.

यंदाचे वर्ष संतपरंपरेचे अध्वर्यू संत ज्ञानेश्वर  यांच्या ७५० व्या जयंती वर्षाचे आहे. त्या औचित्याने हा संपूर्ण सोहळा त्यांच्या जीवनकार्य, तत्त्वज्ञान आणि मानवतावादी विचारांवर आधारित आहे. मराठी भाषा, अध्यात्म आणि संस्कृती यांचा संगम साधणारा हा उपक्रम जागतिक मराठी उत्सव म्हणून साकारत आहे. “मोगरा फुलला” हा कार्यक्रम गणेश शिंदे आणि सन्मिता धापटे-शिंदे  तर  शुभांगी शिंदे ‘मी महाराष्ट्र बोलतोय’ यावर स्वगत सादर करणार आहेत. असे कांबळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला मॉरिशस प्रजासत्ताकाचे उपराष्ट्रपती जीन रॉबर्ट इवान हंगली, कला व सांस्कृतिक कार्य मंत्री महेंद्र गोंदिया तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.  मॉरिशसमध्ये वास्तव्यास असलेल्या मोठ्या मराठी डायस्पोरा समुदायाला मातृभूमीतील आध्यात्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक वारशाशी पुन्हा जोडणारे प्रभावी व्यासपीठ म्हणून “मोगरा फुलला”कडे पाहिले जात आहे.

प्रबोधन परिवाराच्या सन्मिता धापटे-शिंदे म्हणाल्या, “‘मोगरा फुलला’ हा केवळ सांगीतिक कार्यक्रम नसून मराठी अस्मिता, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारशाचा जागतिक उत्सव आहे. मॉरिशसच्या भूमीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुगंध दरवळविणारा हा उपक्रम दोन्ही देशांतील सांस्कृतिक बंध अधिक घट्ट करेल.”

प्रसादराजे भोपळे यांनी सांगितले की, “‘मोगरा फुलला’चा हा पहिला आंतरराष्ट्रीय प्रयोग मॉरिशसमध्ये होत असून, पुढील टप्प्यात पॅरिस (फ्रान्स) येथेही हा उपक्रम नेण्याचा आमचा मानस आहे.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×