Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

ताल-सुरांच्या अनोख्या मिलाफाची मंत्रमुग्ध करणारी सांज

भरतनाट्यमच्या अभिजात मुद्रांचा आणि भेंडीबाजार घराण्याच्या सुरेल गायकीचा अविस्मरणीय संगम

marathinews24.com

पुणे – स्वर्गीय सुर, मधाळ स्वर तर अत्यंत बोलके भाव, काटेकोर शास्त्रशुध्द मुद्रा, लय, तालाचा संगम साधत मंत्रमुग्ध करणारा पडण्यास द्वारे अवकाशाच्या कॅनव्हासवर आकर्षक चित्र चीतारणारी अनोखी सांज पुणेकर रसिकांनी अनुभवली. निमित्त होते ‘मेलांज’ या कार्यक्रमाचे.

महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचा वेल्स अभ्यास दौरा यशस्वी – सविस्तर बातमी

ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने आयोजित ‘मेलांज २०१६’ या कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना संध्या मुरलीधरन व ज्येष्ठ गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांचा कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. यावेळी ऋत्विक फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रवीण कडले, चेतना कडले यांच्यासह अनेक मान्यवर रसिक उपस्थित होते. कोथरूडमदील ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अभिजात भरतनाट्य मधील पारंपरिक नृत्याविष्कार सादर करत संध्या मुरलीधरन यांनी आदी तालतील राग अरबीमधील गणेश वंदनेची पुष्पांजली अर्पण करत सुरुवात केली. देविस्तुती सादर करत देवीची वेगवेगळी रूपे दाखवली. त्यानंतर कृष्णलीलेचे सादरीकरण करत आपल्या मोहक अदाकारीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. अत्यंत बोलके हावभाव, लयबध्द देहबोली, तालबद्ध पदन्यास यामुळे रसिकांच्या नजरा खिळल्या होत्या. भवमुद्रंमधील काटेकोरपणा, त्याचवेळी जपली जाणारी नजकात रसिकांच्या हृदयाला भिडणारी होती. भक्ती, शौर्य, महाकाली विविध रूपांचे दर्शन यावेळी घडविले. त्यांनी आपल्या कलाविषकराच्या सादरीकरणाचा समारोप तिल्लाना सादर करून केला.

कार्यक्रमाचा उत्तरार्ध भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांच्या सुरेल मैफलीने सजला. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीचे बारकावे त्यांनी अगदी लीलया सादर केले. राग पुरिया मध्ये विलंबित एकताल आणि दृत तीनतालातील ‘मै तो करी आयी पिया संग रंगरलीया’ ही पारंपरिक बंदिश सादर करून गायनाला सुरुवात केली. भेंडी बाजार घराण्याचा खास मानलेला राग पटबिहागमधील मध्यलय रूपक ‘ए बना ब्याहान आयो री माई’ आणि द्रुत एकतालातील रचना ‘मद मदन बावरे’ सादर केली. त्यानंतर मांज खमाज मधील झपतालातील ‘अचानक गहेलीनो मोरी बैय्या’ ही रचना त्यांनी पेश केली. समारोप राग भैरवीतील तीनतालातील ‘देखो मोरी चुरिया करक गैया’ या बंदिशीने केला. वेदांग क्षीरसागर (तबला), सौमित्र क्षीरसागर (हार्मोनियम), मृदगंधा व ओवी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

कलाकारांचा सत्कार प्रवीण कडले, चेतना कडले यांनी केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×