Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल सेवांचा नवा टप्पा

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी डिजिटल सेवांचा नवा टप्पा

लाभार्थ्यांसाठी तत्काळ माहिती सेवा

marathinews24.com

पुणे – मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत विविध व्याज परतावा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महामंडळामार्फत आजपर्यंत सुमारे ११,६७० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य व्याज परतावा स्वरूपात वितरित करण्यात आले असून, राज्यातील १ लाख ७० हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.तर पुणे जिल्ह्यात 12 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाच्यासंधी उपलब्ध करुन ९७ कोटी २३ लाख रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य व्याज परतावा स्वरुपात वितरीत करण्यात आले आहे.

शेतकरी न्यायासाठी युवक काँग्रेसचा सत्याग्रह – सविस्तर बातमी 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यावर भर देत महामंडळाने लाभार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचा उहापोह…….

Smart Bot : लाभार्थ्यांसाठी तत्काळ माहिती सेवा
लाभार्थ्यांना योजनांची माहिती, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया किंवा व्यवसाय निवड यासंदर्भात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे मिळावीत यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित Smart Bot सुरू करण्यात आला आहे. हा Smart Bot महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २४x७ उपलब्ध असून, लाभार्थी कोणत्याही वेळी प्रश्न विचारून त्वरित मार्गदर्शन मिळवू शकतात.या सुविधेद्वारे योजनांची सविस्तर माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, व्यवसाय निवडीचे मार्गदर्शन तसेच आर्थिक नियोजनाबाबत सहाय्य उपलब्ध होत असून, आतापर्यंत १५ हजार ५०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

WhatsApp सेवा : माहिती आता थेट मोबाईलवर
डिजिटल युगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या WhatsApp माध्यमाचा उपयोग करून महामंडळाने लाभार्थ्यांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे अर्जाची स्थिती, LOI (Letter of Intent), मंजुरी (Sanction), Claim प्रक्रिया तसेच व्याज परतावा जमा झाल्याची माहिती थेट लाभार्थ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिली जाते.

महामंडळाचा अधिकृत WhatsApp क्रमांक ८९७६८५५९२१ असून, लाभार्थ्यांनी प्राप्त संदेशाला २४ तासांच्या आत प्रतिसाद दिल्यास त्यांच्या प्रकरणाची अद्ययावत माहिती वेळोवेळी मिळू शकते.

WhatsApp Channel द्वारे ताज्या घडामोडी
महामंडळामार्फत अधिकृत WhatsApp Channel सुरू करण्यात आला असून, त्याद्वारे नवीन परिपत्रके, शासन निर्णय, उपक्रम आणि इतर महत्त्वाची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. संबंधित लिंक महामंडळाच्या अधिकृत वेबपोर्टलवर उपलब्ध आहे.

बहुउद्देशीय मुख्यालय उभारणीस मान्यता
महामंडळाच्या वाढत्या कामकाजाचा विचार करून पनवेल, नवी मुंबई येथे सिडकोमार्फत सुमारे १.५ एकर जागा अत्यल्प दराने मंजूर करण्यात आली आहे. प्रस्तावित ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज बहुउद्देशीय मुख्यालय उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालय, लाभार्थी सहाय्यता केंद्र, प्रशिक्षण व कौशल्य विकास विभाग, निवासी प्रशिक्षण सुविधा, संशोधन केंद्र, डिजिटल सेवा केंद्र तसेच परिषद व मार्गदर्शन कक्ष उभारण्यात येणार असून, यामुळे महामंडळाचे कामकाज अधिक कार्यक्षम, गतिमान व सुलभ होण्यास मदत होणार आहे. ही सर्व उपक्रम योजना प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल सक्षमीकरण आणि लाभार्थी-केंद्रित सेवांच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक उन्नतीस चालना देणारे ठरत आहेत, अशी माहिती जिल्हा समन्वयक प्राजक्ता ओंकार येरुणकर यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×