Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

शेतकरी न्यायासाठी युवक काँग्रेसचा सत्याग्रह

शेतकरी न्यायासाठी युवक काँग्रेसचा सत्याग्रह

भारत-अमेरिका कराराविरोधात शेतकरी न्यायासाठी युवक काँग्रेसचा सत्याग्रह

marathinews24.com

पुणे – भारत-अमेरिका कराराविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या शेतकरी न्याय सत्याग्रहाला पुणे जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा निर्णय भारतीय शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला असून, तो तात्काळ मागे घेतला गेला नाही, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.

एकल महिलांसाठी जिल्हा परिषदेचा ‘माझे अस्तित्व’ महत्वाकांक्षी प्रकल्प – सविस्तर बातमी 

या सत्याग्रहाला माजी आमदार रामहरी रुपनवर व पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष लहू निवंगूने यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, वीरधवल गाडे, विश्वजीत जाधव, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, सौरभ अमराळे, यशवंत मोहोळ, वैभव यादव, अशोक घोलप, सौरभ रुपनवर, वैभव बुरंगुले, संकेत गवारी, राहुल जाधव, संदिप सातकर आदी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या आंदोलनाला शेतकरी, युवक व सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, आगामी काळात हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

उमेश पवार यांनी केंद्र सरकारच्या या तथाकथित किसान ट्रेड डीलवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेली धोरणे शेतकऱ्यांसाठी मारक आहेत. कर्जमाफी होत नाही. शेतीमालाला एमएसपीनुसार भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण युवक काँग्रेसच्या माध्यमातून गावागावातून युवकांना एकत्र करून हा लढा अधिक बळकट करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील. ‘शेतकरी वाचवा, युवक वाचवा, भारत वाचवा’ हा नारा जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे.”

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×