Breking News
पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करापुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधामहाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनपुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडूबारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

प्रतिस्पर्धी टोळीतील एकाच्या खूनाचा डाव उधळला

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

शेखापुरे टोळीच्‍या तिघांना बेड्या

marathinews24.com

पुणे – प्रतिस्पर्धी टोळीतील साथीदाराच्या खूनाचा कट गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी संयुक्त कारवाईत उधळून लावला आहे. खून करण्याच्या कटात सहभागी असलेल्या तिघा सराईत आरोपींना जेरबंद करण्यात आले. अवैध पिस्‍तुलासह कट रचणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन दिवसांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्‍या. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.या कारवाईमुळे मोठा गुन्‍हा टळला.’

टोळक्याकडून मारहाण, औंध परिसरातील घटना – सविस्तर बातमी 

प्रकरणातील मुख्य आरोपी अमित मल्लिकार्जुन शेखापुरे याच्याबाबत माहिती खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस अमलदार आजाद पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्याला सोमवारी पेठ येथून अटक करण्यात आली. दुसरा आरोपी निखिल ज्ञानोबा लगाडे (वय २३, रा. गुलटेकडी) याच्याबाबतची माहिती युनिट पाचचे पोलीस अमलदार अकबर शेख व राहुल दमडेरे यांना मिळाली होती. तर तिसरा आरोपी अन्वर उर्फ जंबा शाकीर शेख (वय २३, रा. औद्योगीक वसाहत, गुलटेकडी) याच्याबाबत माहिती युनिट दोनचे पोलीस अमलदार शंकर नेवसे, विनोद चव्हाण, उज्ज्वल मोकाशी, विनायक वाघमारे यांना प्राप्त झाली होती. माहितीनुसार, शेखापुरे टोळीने प्रतिस्पर्धी उमाप टोळीतील एका साथीदाराचा खून करण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्यांनी अवैध पिस्‍तुले मिळवून तयारी सुरू केली होती. हालचालींची माहिती मिळताच संबंधित पथकांनी सापळा रचून १३ मार्चला काही आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले.

फरार मुख्य आरोपीचा शोध घेऊन २ एप्रिलला त्याला अटक करण्यात आली. तसेच इतर आरोपींनाही त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी छापा टाकून पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक व शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राजमाने, पोलीस निरीक्षक संदीप पवार, पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ही कारवाई यशस्वी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×