Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

वैमनस्यातून तरुणासह मित्रावर शस्त्राने वार

पादचारी जेष्ठेचे पावणेदोन लाखांचे गंठण हिसकावले

आंबेगावमधील घटना; चौघे गजाआड

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. त्यानंतर रस्त्यात थांबलेल्या एकाची दुचाकी घेऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत उमेश शिवाजी शिंदे (वय २६, रा. सयाजी इस्टेट, बेनकर वस्ती, धायरी) याने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अभियांत्रिकी प्रवेशाच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

गणेश उदय जाधव (वय २१, रा. कृष्णकुंज सोसायटी, स्वामी नारायण मंदिराजवळ, आंबेगाव) समीर दत्ता मरगळे (वय १९, रा. भोडे, ता. मुळशी), विशाल विश्वास किलजे (वय २१, रा. स्पर्श सोसायटी, नऱ्हे) गौरव गजानन जगताप (वय २०, रा. सूर्यव्हिला सोसायटी, नऱ्हे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जाधव, मरगळे, किलजे, जगताप यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण त्याच्या मित्रासह दुचाकीवरून २७ ऑक्टोबर रोजी आंबेगाव परिसरातून रात्री घरी निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवले. जुना वाद मिटवून टाकू असे सांगून आरोपींनी शिंदे याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी शिंदे, त्याचा मित्र प्रदीप जोगदंडे यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी नाथसृष्टी सोसायटीच्या परिसरात थांबलेल्या दोघांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या परिसरात थांबलेल्या एका तरुणाची दुचाकी घेऊन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग तपास करत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×