हडपसरमधील आगीमागे तरुणाचा हात

पोलिसांच्या पथकाने तपास करुन आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागातील राम मनोहर लाेहिया उद्यानाजवळील मजुरांच्या वसाहतीत शनिवारी पहाटे आग लागली होती. आगीत १९ झोपड्या, तसेच तीन दुचाकी भस्मसात झाल्या. आग लागल्यानंतर मजूर आणि त्यांचे कुटुंबीय बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र या आगीमागे एका तरुणाचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

तलवारीने केक कापणाऱ्या टोळक्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

समर्थ तुपे (वय २०, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर राम मनोहर लोहिया उद्यान आहे. उद्यानाच्या मागील बाजूस मजुरांची वसाहत आहे. वसाहतीतील एका झोपडीला शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली. झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात बांबू आणि पत्र्याचा वापर करून बांधण्यात आल्या आहेत. गृहोपयोगी साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. आग भडकल्यानंतर शेजारी असलेल्या झोपड्यांनी पेट घेतला. आग लागल्यानंतर वसाहतीतील मजूर आणि कुटुंबीय बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळ धाव घेऊन अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. पाेलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी परिसरातील रहिवाशांची चौकशी केली. तेव्हा वसाहतीला आग ही दुर्घटना नसून, वसाहतील एका तरुणाशी वाद झाल्याने त्याची दुचाकी पेटवून देण्यात आली. दुचाकीने पेट घेतल्यानंतर शेजारी असलेल्या झोपड्यांना आग लागली, अशी माहिती चौकशीत मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करुन आरोपी समर्थ तुपे याला ताब्यात घेतले. तुपे याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याचा वसाहतीतील एका तरुणाशी वाद झाला होता. वादातून त्याने दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर या दुचाकीची झळ शेजारी असलेल्या दाेन दुचाकींना पोहोचली. आग भडकल्यानंतर त्याची झळ झोपड्यांना बसली. त्यानंतर एकापाठोपाठ झोपड्यांनी पेट घेतला. ‘पोलिसांनी या प्रकरणी तुपेला याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता ३२६ अन्वये ( जाणीवपूर्वक आग लावून देणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे’, अशी माहिती पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंंदे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×