Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात नोकरीच्या मोहात तरूणाने गमवाले ११ लाख रूपये

पुण्यात नोकरीच्या मोहात तरूणाने गमवाले ११ लाख रूपये

मार्केटयार्ड परिसरातील घटना 

marathinews24.com

पुणे – नोकरीच्या मोहात अडकलेल्या तरूणाने तब्बल ११ लाख रूपये गमावल्याची घटना मार्केटयार्ड परिसरात घडली आहे. याप्रकरणी गंगाधाम चौकात राहणार्‍या तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ८ मे ते ३० जून कालावधीत मार्केटयार्डमध्ये घडली आहे.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली ३२ लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मार्केटयार्ड परिसरातील गंगाधाम चौकातील इमारतीत राहायला आहे. ८ मे रोजी साबयर चोरट्यांनी त्याला फोन करून लिकर कंपनीमध्ये एचआर मॅनेजर असल्याची बतावणी केली. तक्रारदाराला जॉब देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याने तरूणाला स्वतःच्या बँकखात्यात पैसे वर्ग करण्यास भाग पाडले. तब्बल ११ लाख रूपये वर्ग करूनही तरूणाला नोकरी मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मार्केटयार्ड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक सुनिता नवले तपास करीत आहेत.

जादा परताव्याच्या आमिषाने तरूणीची फसवणूक

टास्क पुर्ण करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्याने एका २३ वर्षीय तरूणीचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तिला जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या तब्बल ६ लाख ४२ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १२ ते १४ जुलैला खराडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणीने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×