Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

टिळक रस्त्यावर एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणाची फस‌वणूक

चोरट्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल

 marathinews24.com

पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणाची चोरट्यांनी ४० हजारांची फसवणूक केल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध खडक पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीच्या आमिषाने तरुणींची ३० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण धनकवडीतील बालाजीनगर परिसरात राहायला आहे. १४ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमराास तरुण टिळक रस्त्यावरील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्या वेळी एटीएमच्या परिसरात चोरटा थांबला होता. एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एटीएममधून रोकड बाहेर आली नाही. तरुणाच्या पाठोपाठ एटीएममध्ये शिरलेल्या चोरट्याने तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी केली.

तरुणाकडे मदतीचा बहाणा करुन चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्डाचा वापर पैसे काढण्यासाठी केला. पैसे न मिळाले नसल्याने चोरट्याने तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी करुन बोलण्यात गुंतविले. चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड तरुणाला दिले आणि पसार झाला. त्यानंतर तरुणाच्या डेबीट कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा वापर करुन चोरट्याने एटीएममधून ४० हजारांची रोकड काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×