Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कात्रज घाटात नेऊन तरुणीने साथीदारांच्या मदतीने लुटले

कात्रज घाटात नेऊन तरुणीने साथीदारांच्या मदतीने लुटले

भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीसह चार ते पाच जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – समाजमाध्मयात अनोळखी व्यक्तींशी ओळख महागात पडण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. पुण्यातील एका तरुणाची ओळख समाजमाध्यमातून तरुणीशी ओळख झाली. कात्रज घाटात फिरायला जाऊ, असे सांगून तरुणीने त्याला बोलाविले. कात्रज घाटात तरुणीने साथीदारांच्या मदतीने त्याला धमकावून लुटल्याची घटना नुकतीच घडली.

हडपसर भागात खासगी रुग्णालयात तोडफोड – सविस्तर बातमी 

भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीसह चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण भूगाव परिसरात राहायला आहे. समाजमाध्यमातून त्याची तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला. तरुणीने त्याला जाळ्यात ओढले. ७ डिसेंबर रोजी तरुणीने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला. कात्रज घाटात फिरायला जाऊ, असे तिने सांगितले. त्यानंतर तरुण दुचाकीवरुन कात्रज घाटात गेला. तरुणी त्याच्यासोबत दुचाकीवरुन निघाली. काही अंतरावर अंधारात तरुणीबरोबर असलेले साथीदार दबा धरून बसले होते.

दुचाकीस्वार तरुणाला अडवून त्याला धमकावले. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात दुचाकी नेण्यास सांगितले. येवलेवाडीत तरुणाला मारहाण केली. बलात्कार, तसेच बाललैंगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तरुणीने त्याच्याकडे ७० हजार रुपये मागितले. तरुणाकडे एवढी रक्कम नव्हती. त्यानंतर तरुणाकडून दहा हजार रुपये घेतले. धमकावून त्याला सोडून देण्यात आले. पैसे दिल्यानंतर त्याला उर्वरित रक्कम देण्यासाठी धणकाविण्यात आले. धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने अखेर पोलिसंकडे तक्रार दिली. पसार झालेल्या तरुणीसह साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×