Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Aadi Anant Marathi Movie : ‘दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगला ‘आदि अनंत’चा संगीत अनावरण सोहळा!

Aadi Anant Marathi Movie

राहुल देशपांडे, पद्मश्री अशोक सराफ यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

marathinews24.com

पुणे – Aadi Anant Marathi Movie : पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘आदि अनंत’मधील ‘दिगंबरा दिगंबरा’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याच्या निमित्ताने पुण्यात चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल सादरीकरणाला पद्मश्री अशोक सराफ यांनी तबल्याची साथ देत ठेका धरला. या खास संगीत मैफलीसोबतच कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पाही रंगल्या. या सोहळ्याला पद्मश्री अशोक सराफ, छायाचित्रकार, दिग्दर्शक महेश लिमये, संकर्षण कऱ्हाडे, सखी गोखले, निर्माते मुरलीधर छतवानी, समीर हंपी, अनिकेत मराठे, रविंद्र औटी आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

देवीस्वरूप असलेल्या १०८ मुलींचे श्री महालक्ष्मी मंदिरात कन्यापूजन – सविस्तर बातमी 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दिगंबरा दिगंबरा’ या गाण्याला संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखन केलं आहे. तर राहुल देशपांडे यांच्या आवाजाने या गाण्यात आर्तता आणली आहे. महेश लिमये दिग्दर्शित ‘आदि अनंत’ Aadi Anant Marathi Movie हा नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि सहवासाचं महत्त्व सांगणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमधून अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं समोर आलं होतं. या दोघांसोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. चित्रपटाच्या कथेतून उलगडणाऱ्या नात्यांच्या भावविश्वाला संगीताची साथ लाभली आहे.

संगीतकार अविनाश-विश्वजीत म्हणतात, “‘आदि अनंत’च्या संगीतावर काम करताना चित्रपटातील नात्यांमधल्या वेगवेगळ्या भावना सुरांतून मांडण्याचा प्रयत्न केला. ‘दिगंबरा दिगंबरा’ या गाण्याच्या माध्यमातूनही संगीत आणि शब्द यांचा सुंदर मेळ साधता आला.”

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. ‘आदि अनंत’मधील नाती ही आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी एखादा संवाद, कधी एखादी छोटी कृती, तर कधी फक्त सोबत असणंही नात्याची खोली सांगून जातं. हीच सहजता आणि आपलेपणा चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील संगीतही या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटाचा विचार उपस्थितांपर्यंत पोहोचवता आला, याचा आनंद आहे.”

पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रण आणि दिग्दर्शनाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. येत्या १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणे पॅनोरमा म्युझिकवर उपलब्ध आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×