गुन्हे शाखेच्या युनिट सातची कारवाई
marathinews24.com
पुणे – मोक्का गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट सातने बेड्या ठोकल्या आहेत. त्याला येरवडा येथील भोसलेवस्ती परिसरातून पकडण्यात आले. विनीत राजु देवकर (वय ३०, रा. वडारवस्ती, येरवडा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. शहरात होळी तसेच रंगपंचमीच्या निमित्ताने शहरात गुन्हेगारांच्या झडतीसंदंर्भाने विशेष मोहिम राबविली होती. गुन्हे शाखा सातकडून कारवाई करण्यात आली.
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू – सविस्तर बातमी
येरवडा परिसरातील भोसलेवस्ती येथे खराडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध धमकावणे तसेच इतर कलमान्वये दाखल गुन्ह्यात मोक्का कारवाई केली होती. त्या कारवाईतील आरोपी विनीत देवकर हा आला असल्याची माहिती मिळाली. माहितीनुसार पथकाने या भागात सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खराडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.






















