Breking News
Pune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूक

कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपी पुण्यातून अटकेत

कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपी पुण्यातून अटकेत

सापळा लावून पसार झालेल्या आरोपीला केली अटक

marathinews24.com

पुणे – जमिनीच्या वादातून रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात गोळीबार करुन पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. शिवाजीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ प्रभाकर केंगार (वय २४, रा. हेल्थ कॅम्प, महापालिका वसाहत, पांडवनगर, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

चुलत भावाचा खून करण्यासाठी ४ लाखांची सुपारी – सविस्तर बातमी 

रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबरला जमिनीच्या वादातून केंगारने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. याप्रकरणी केगार याच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंगार हा गोळीबार प्रकरणात पसार झाला होता. कर्जत पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.

केंगार हा वडारवाडी परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस हवालदार शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी, विजयकुमार पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. केंगार याला कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, कुंभार, मोकाशी, पवार, संजय जाधव, सर्जेराव सरगर, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, गणेश आबनावे यांनी ही कामागिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×