Breking News
Pune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूक

चुलत भावाचा खून करण्यासाठी ४ लाखांची सुपारी

कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपी पुण्यातून अटकेत पुणे-जमिनीच्या वादातून रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात गोळीबार करुन पसार झालेल्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. शिवाजीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ प्रभाकर केंगार (वय २४, रा. हेल्थ कॅम्प, महापालिका वसाहत, पांडवनगर, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबरला जमिनीच्या वादातून केंगारने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. याप्रकरणी केगार याच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंगार हा गोळीबार प्रकरणात पसार झाला होता. कर्जत पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. केंगार हा वडारवाडी परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस हवालदार शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी, विजयकुमार पवार यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. केंगार याला कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष साेनवणे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, कुंभार, मोकाशी, पवार, संजय जाधव, सर्जेराव सरगर, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, गणेश आबनावे यांनी ही कामागिरी केली.

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन खून; चौघे अटकेत

marathinews24.com

पुणे – नात्यातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीच्या चौकशीत त्याने साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे. खून प्रकरणातील साक्षीदार हा खून प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली.

फोफावलेल्या लाचखोरीला लगाम लागेना – सविस्तर बातमी 

कात्रजमधील गुजरवाडी परिसरात एका नियोजित गृहप्रकल्पाजवळ १७ नोव्हेंबर रोजी अजयकुमार गणेश पंडीत (वय २२, सध्या रा. साईनगर, खोपडेगनर, कात्रज,मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करुन अजयकुमार याचा चुलतभाऊ अशोक कैलास पंडीत (वय ३५, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती.

पोलिसांनी अशोककडे चौकशी केली, तेव्हा अजयचे नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध होते. याबाबतची माहिती आरोपी अशोक याला मिळाल्यानंतर त्याने अजयचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानतर पोलिसांनी अशोक चौकशी केली. तेव्हा त्याने खून प्रकरणात आरोपी कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (वय २१), सचिनकुमार शंकर पासवान (वय २६), तसेच खून प्रकरणातील पहिला साक्षीदार रणजीतकुमार धनुखी यादव (वय ३०) हे सामील असल्याची कबुली दिली.

अशोकने चुलतभाऊ अजय याचा खून करण्यासाठी कृष्णकुमार, सचिनकुमार, रणजीतकुमार यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती तपासात मिळाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून आरोपी रेल्वेने झारखंडला पसार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कृष्णकुमार, सचिनकुमार, रणजितकुमार यांना अटक केली

तिघे आरोपी मूळचे झारखंडचे रहिवासी आहेत. ते कात्रजमधील साईनगर परिसरात नियोजित गृहप्रकल्पात मजुरी करत होते. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याने अशोक चिडला होता. त्याने चुलतभाऊ अजय याचा खून करण्यासाठी तिघा आरोपींना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिषठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक स्वप्निल पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सचिन सरपाले, नवनाथ भोसले, सागर बोरगे, महेश बारावकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, निलेश खैरमोेडे, अवधुत जमदाडे, सोनाली पिलणे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×