Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास

बीडमधील गायकवाड हत्या प्रकरणात २ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एच. पाटोदकर यांचा निकाल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी सरफराज रशीद सय्यद (रा. इस्लामपुरा) यास न्यायालयाने दोषी ठरवले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एच. पाटोदकर यांनी त्याला १० वर्षे सश्रम कारावास व नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास नऊ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. इस्लामपुरा पेठ परिसरात घटना घडली होती.

बोलण्यात गुंतवून तरूणाची सोन्याची चैन हिसकावली – सविस्तर बातमी

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवुन आरोपीने तिला फुस लावुन पळवून नेले. तिचे ईच्छेविरुध्द बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन पेठ बीड आरोपी विरुध्द कलम ३६३, ३६६ (ए), ३७६ (२) (जे) (एन) भादवी आणि कलम ३, ४ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ प्रमाणे गुन्हा नोंद झाला. तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक जी. एच. पठाण यांनी प्रकरणाचा तपास केला. जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय बीड येथे आरोपी विरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाची सुनावनी मा. व्ही. एन. पाटवदकर साहेब अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ तथा विशेष न्यायाधिश बीड यांच्या न्यायालयात झाली.

आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. प्रकरणात पीडीतेचा जबाब, वैद्यकिय पुराव्यासह कागदपत्रानुसार सहायक सरकारी वकिल सुहास व्ही. सुलाखे यांचा युक्तीवाद. ग्राहय धरुन व्ही. एच. पाटवदकर यांनी आरोपी आरोपीला दोषी ठरवले. कलम ३६३, ३६६ (ए), ३७६ (२) (जे) भादवी आणि कलम ४ बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंध कायदा सन २०१२ प्रमाणे दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावास, नऊ हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सहायक सरकारी वकिल सुहास व्ही. सुलाखे यांनी काम पाहिले त्याचप्रमाणे फिर्यादी तर्फे ऍड. शाम देशपांडे, ऍड. यशवंत मुंडे, ऍड. सुनिल ढाकणे यांनी काम पाहिले पैरवी अधिकारी पोपट साहेबराव गव्हाणे आणि बाळासाहेब डख, भिमराव सानप यांनी सहकार्य केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×