बोलण्यात गुंतवून तरूणाची सोन्याची चैन हिसकावली

फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार तरूणाला थांबवून चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील १ लाख २२ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना २१ जानेवारीला रात्री पावणेदहाच्या सुमारास फुरसुंगी परिसरातील सासवड रोडवर घडली आहे. याप्रकरणी भेकराईनगरात राहणार्‍या २७ वर्षीय तरूणाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

घरातून दीड लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खासगी कंपनीत कामाला असून, २१ जानेवारीला कामावरून सुटल्यानंतर तो दुचाकीवरून जात होता. त्यावेळी एनआयबीएम कंपनीजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याला थांबवले. बोलण्यात गुंतवून चोरट्यांनी तरूणाच्या गळ्यातील १ लाख २२ हजारांची सोन्याची चैन हिसकावली. तरूणाने आरडा-ओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×