येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पसार झालेला आरोपी ३ तासात अटकेत

येरवडा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून पसार झालेला आरोपी ३ तासात अटकेत

स्वच्छतागृहातील काचा उचकटून आरोपी झाला होता पसार

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीतून (लाॅकअप) पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. लाॅकअपमधील स्वच्छतागृहातील काचा उचकटून आरोपी पसार झाला. पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार आरोपीला येरवड्यातून अटक केली. शैलेश राजू माेहिते (वय १९, रा. कामराजनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुचाकी विक्री दालनातून रोकड चोरणारा गजाआड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहिते याला अल्पवयीन युवतीवर बलात्कार, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करुन त्याला ५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. रविवारी (८ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मोहितेने काेठडीत अंथरण्यासाठी चादर हवी आहे, असा बहाणा केला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष चुकवून तो स्वच्छतागृहात केला. स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा सरकवून उतरला आणि पसार झाला. काही वेळानंतर मोहिते पसार झाल्यााचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने मोहिते याला येरवडा परिसरातून रात्री दहाच्या सुमारास अटक केली. पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×