Breking News
बळीराजाच्या मदतीसाठी शासन बांधावर;संकटाच्या काळात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या पाठीशी ! – विशेष लेखगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज; पथके तैनातCyber Fraud Awareness Pune :‘लोकसंवाद-२०२६’मधून सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहनRohit Pawar MPSC Protest : आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीDhol Tasha Decibel Check : तर ढोल-ताशा पथकांवरही कारवाई- पोलीस आयुक्त अमितेश कुमारगणेश विसर्जनासाठी पुणे शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्थाPune MLC Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूकहवेलीचे वैभव असलेल्या किल्ले सिंहगड स्मारक जतन व दुरुस्तीसाठी शासनाकडून ९ कोटींचा निधी मंजूर‘दगडूशेठ’ गणपतीला १५१ किलो मोतीचूराच्या भव्य मोदकाचा नैवेद्य दहिवाळ आणि शहाणे परिवारातर्फे अर्पणPCPNDT MTP Task Force : पीसीपीएनडीटी-एमटीपी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्कफोर्सच्या कामाला गती; ऑक्टोबरमध्ये कृती आराखडा

दुचाकी विक्री दालनातून रोकड चोरणारा गजाआड

दुचाकी विक्री दालनातून रोकड चोरणारा गजाआड

गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसमधील दुचाकी विक्री दालनातून पावणेतीन लाख रुपयांची रोकड चोरुन पसार झालेला कामगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.कामगाराकडून दुचाकी, तसेच अडीच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. बापूराव संदीपान गायकवाड (वय २५, सध्या रा. कैलासनगर, वडकी, हडपसर-सासवड रस्ता, मूळ रा. निळज, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

हडपसर भागातील दुचाकी विक्री दालनात कामगारांचे वेतन करण्यासाठी दोन लाख ७० हजार रुपयांची रोकड मालकाने ठेवली होती. दुचाकी विक्री दालनात काम करणारा कामगार गायकवाड याने कप्प्यात ठेवलेली रोकड चोरली. रोकड चोरीला गेल्यानंतरा मालकांनी याबाबत हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांनी फिर्यादीत संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसंनी तपास सुरू केला.

दुचाकी विक्री दालनातून कामगार गायकवाड याने रोकड चोरल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील पोलीस कर्मचारी प्रशांत कर्णवर आणि अमित कांबळे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाड याला पकडले. त्याच्याकडून दोन लाख ५९ हजार रुपये आणि दुचाकी असा तीन लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गनु्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक अभिजित पवार, प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, नासीर देशमुख यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×