Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडे तीन हजार जणांविरुद्ध कारवाई

शहरात पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

marathinews24.com

पुणे – महानगरपालिका निवडणूक शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिस दलाने कंबर कसली आहे. मागील काही दिवसांत व्यापक बंदोबस्त राबविण्यात आला असून तब्बल साडे तीन हजारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

दुचाकी एन बी मालिकेतील आकर्षक नंबरसाठी अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर – सविस्तर बातमी

शहरात १४ पोलिस उपायुक्त, ३० सहायक पोलिस आयुक्त, १६६ पोलिस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच १२ हजार ५०० पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. ३ हजार २५० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या चार तुकड्या बंदोबस्तासाठी कार्यरत आहेत. शहरातील ८८ सेक्टर निश्चित करून संवेदनशील भागात विशेष दक्षता घेतली जात आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान १८ स्थिर, १५ फिरते व १५ व्हिडिओ सर्वेक्षण पथकांद्वारे सतत नजर ठेवण्यात येत असून या कारवाईत आतापर्यंत ६७ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विविध प्रतिबंधात्मक कायद्यांखाली एकूण ३ हजार ४३९ कारवाया करण्यात आल्या आहेत.

दारूबंदी कायद्यान्वये १७९ गुन्हे दाखल करून १ कोटी २३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत एमडी, गांजा, चरस व नशेच्या गोळ्यांसह सुमारे २६ लाख ८४ हजार ७२९ रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. निवडणूक काळात १५ अग्निशस्त्रे, १५ काडतुसे व २९ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली असून ३ हजार २९४ परवाना धारकांची शस्त्रे तात्पुरती जमा करून घेण्यात आली आहेत. याशिवाय शहरात ३१३ अजामीनपात्र वॉरंट्स बजावण्यात आले आहेत.

मतदान स्लिप वाटप, चांदीच्या वस्तूंचे वाटप आणि पैशांचे वाटप या संदर्भातील १७ गुन्हे दाखल करून २ लाख ६ हजार ३५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत हिंसाचाराचा एकही प्रकार घडला नसल्याचे पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×