Breking News
सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कररुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहातमहिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन

पुण्यात ५ हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई

पुण्यात ५ हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई

१ कोटींचा दंड वसूल

marathinews24.com

पुणे – शहरात ट्रिपल सीट’ दुचाकी चालविणे, विरुद्ध दिशेने जाणे, तसेच कर्णकर्कश हाॅर्न अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गेल्या पाच दिवसात पोलिसांनी ५ हजार ३८० दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत बेशिस्त दुचाकीस्वारांकडून एक कोटी तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यत आला. ‘भरधाव दुचाकी चालविणे, वाहतूक नियम धुडाकाविण्यामुळे गंभीर अपघात होतात. विरुद्ध दिशेने जाणे, तसेच ‘ट्रिपल सीट’ जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या चुकांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत.

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून – सविस्तर बातमी 

वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकांनी शहरातील प्रमुख रस्ते, चौकात वाहतूक नियम धुडकविणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. दुचाकीस्वारांची तपासणी केली. गेल्या पाच दिवसात वाहतूक पोलिसांनी ५ हजार ३८० दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत बेशिस्त दुचाकीस्वारांकडून एक कोटी तीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला’, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. हेल्मेट न वापरणे, वेगमर्यादा धुडकाविणे, सिग्नल मोडणे अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. दुचाकीस्वारांकडून त्वरीत दंड वसूल करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतल्या. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर टप्याटप्याने दुचाकी परत देण्यात येणार आहेत.

पुढील काळात वाहतूक नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध नियमित कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×