Breking News
सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प-विद्याधर अनास्कररुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहातमहिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या पापा शेखसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखलरुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – भानुप्रताप बर्गे यांचे मतउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून

पूर्वसूचना न देता रस्ते खोदाई; गॅस कंपनीसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

येरवड्यातील घटना

marathinews24.com

पुणे – दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आल्याची घटना येरवड्यात घडली. या प्रकरणी पोलिसांकडून एकाला अटक केली. माशाक गाझीबक्ष विजापुरे (वय ४०, रा. येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश वसंत शिंदे याला अटक करण्यात आली.

बीडच्या केज नगरपंचायतमध्ये ३.६२ कोटींचा घरकुल योजनेत भ्रष्टाचार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माशाक आणि गणेश मित्र आहेत. दाेघे जण शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास येरवड्यातील कामराजनगर परिसरात दारू पित होते. या वेळी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. माशाकने आरोपी गणेश याला शिवीगाळ केली. गणेशने शेजारी पडलेले दांडके उचलून माशाकच्या डोक्यात घातले. माशाकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. गणेशने त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रतिसाद न दिल्याने गणेश घाबरला आणि तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. माशाकला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.पसार झालेला आरोपी गणेश याला पोलिसांनी सायंकाळी अटक केली. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून त्याने मित्राच्या डोक्यात दांडके मारल्याचे पोलिसांना सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×