Breking News
Pune Rain Update : पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवातपुणे महापालिकेच्या सर्व्हर रूममधून कॉम्प्युटरची हार्ड डिस्क चोरीलापर्वती परिसरात सिक्युरटेक कंपनीची १९ लाखांची फसवणूकगाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगडदारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा

बीडच्या केज नगरपंचायतमध्ये ३.६२ कोटींचा घरकुल योजनेत भ्रष्टाचार

बीडच्या केज नगरपंचायतमध्ये ३.६२ कोटींचा घरकुल योजनेत भ्रष्टाचार

दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची नमिता मुंदडा यांची मागणी

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील केज नगरपंचायतीमध्ये घरकुल योजनेत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आलेल्या निधीत ३ कोटी ६२ लाख रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री, नगरविकास सचिव, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना २ फेब्रुवारीला पत्र लिहून विशेष समितीमार्फत चौकशी करण्याची आणि गैरवापर झालेली रक्कम व्याजासह वसूल करण्याची मागणी केली आहे.

रस्ते अपघात व सुरक्षेकडे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष-गोपाळकृष्ण पिल्लई – सविस्तर बातमी 

लेखापाल, वित्त नियंत्रक आणि म्हाडाच्या तपासणी अहवालातून हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा भ्रष्टाचार प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘बीएलसी’ घटकांतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट जमा होणारा केंद्र व राज्य शासनाचा निधी नियमांचे उल्लंघन करून इतर अनधिकृत कामांसाठी वळवण्यात आला आहे. शासनाच्या स्पष्ट सूचना असतानाही ‘एसएनए’ (झिरो बॅलन्स) खात्यातील निधी परत न करता तो अन्य कामांसाठी खर्च करण्यात आला. विशेष म्हणजे, या व्यवहाराशी संबंधित आवश्यक लेखा संचिका, देयके, व्हाउचर आणि महत्त्वाच्या नोंदी कार्यालयातून गहाळ असल्याचे निष्पन्न झाले आहे, ज्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून येते. आमदार नमिता मुंदडा यांनी पत्रात नमूद केले आहे की, ही योजना गरिबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. मात्र, अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे शासनाच्या योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेच्या विश्वासाला तडा जात आहे. सार्वजनिक निधीचा हा थेट गैरवापर असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे गंभीर उल्लंघन आहे. याप्रकरणी तत्कालीन जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून, संचिका गायब करणे हा पुरावे नष्ट करण्याचा प्रकार आहे.

त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ विशेष समितीमार्फत चौकशी करून सर्व संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आमदार मुंदडा यांनी मांडली आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी आता राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार , याकडे संपूर्ण केज तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जनतेच्या विश्वासाला तडा

प्रधानमंत्री आवास योजना ही गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळवून देणारी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, केजमध्ये झालेल्या या भ्रष्टाचारामुळे या योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जनतेच्या शासनावरील विश्वासाला तडा गेला आहे. सार्वजनिक निधीचा अपहार कदापि सहन केला जाणार नाही, प्रकरणात शेवटपर्यंत पाठपुरावा करणार अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार मुंदडा यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×