सायलेन्सर मॉडीफाय करणाऱ्या गॅरेज चालकावर कारवाई

सायलेन्सर मॉडीफाय करणाऱ्या गॅरेज चालकावर कारवाई

वारजेत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलिसांनी ट्रिपल शीट दुचाकी चालकांवर तसेच कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या वाहनांवर विशेष कारवाई मोहिम हाती घेतली आहे. त्यानंतर आता सायलेन्सरचे मॉडीफिकेशन करून ते वाहनांना बसवून देणाऱ्या गॅरेज चालकही पोलिसांच्या रडावर आले आहेत. वारजे माळवाडी पोलिसांनी गॅरेज चालकावर कारवाई करून गुन्हा नोंद केला आहे. त्यासोबतच स्वारगेट व उपनगरांमधील अशा सर्वच गॅरेज चालकांवर नजर ठेवली जाणार असून, सर्वांना सक्त ताकीद देखील देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

लोणीकंद भागात दोन गटात हाणामारी – सविस्तर बातमी 

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिस तसेच स्थानिक पोलिसांना बेशिस्तपणे दुचाकी चालक तसेच ट्रिपल शीट आणि राँग साईडने वाहने चालवणाऱ्याविरोधात कारवाईच्या सूचना केल्या होत्या. मंगळवारी वाहतूक विभागाच्या ३० शाखा आणि ४४ स्थानिक पोलिस ठाण्यांनी विशेष मोहीम राबवत दिवसात तब्बल १ हजार ७०० वाहन चालकांवर कारवाई केली.

नियभंगावेळी अनेक भागात वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदलकरून (मॉडीफाय) त्यातून कर्णकर्कश आवजही काढला जात असल्याचे निदर्शनास आले. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी वाहनांवर कारवाई केली. हे सायलेन्सर कोठून मॉडीफाय केले, याचाही तपास केला. तेव्हा वारजेतील “रॉयल बाईक सर्व्हिस” या गॅरेजमधून मॉडीफाय केल्याचे दिसून आले. नंतर पोलिसांनी या गॅरेजवर देखील कारवाई केली. तसेच, गॅरेज चालकावर गुन्हा नोंदवला आहे.

गॅरेज चालक रडावर

बुलेट आणि इतर स्पोर्ट्स बाईकला मॉडीफाय सायलेन्सर बसविले जात आहेत. वारजेतील रॉयल बाईक सर्व्हिस या गॅरेज चालक योगेश दामोदर सपकाळ (वय ३२) याच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर आता शहरातील सर्वच गॅरेज चालकही पोलिसांच्या रडावर आले आहेत. उपनगरांमध्ये असलेल्या गॅरेज चालकांकडून मॉडीफाय सायलेन्सर बसवून दिले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×