Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

लोणीकंद भागात दोन गटात हाणामारी

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

परस्परविरोधी फिर्यादी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून दोन गटात मारामारी झाल्याची घटना नगर रस्त्यावरील पिंपरी सांडस गावात मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार दोन्ही गटातील १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रजमध्ये फ्लॅटमधून ४ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी 

अनिल साखरचंद काळे (वय ४५, रा. श्री लक्ष्मी मंदिराजवळ, पिंपरी सांडस, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजी श्रीराम, गुलाब सखाराम श्रीराम (वय ५०), राहुल गुलाब श्रीराम (वय २६), दीपक शिवाजी श्रीराम (वय २८), जय शिवाजी श्रीराम (वय ४५), सीता गुलाब श्रीराम (वय ४३, रा. पिंपरी सांडस, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखळ करण्यात आला आहे. किरकाेळ वादातून आरोपींनी पत्नीला मारहाण करुन तिचा मोबाइल फेकून दिल्याचे अनिल काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.

गुलाब सखाराम श्रीराम (वय ४५) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनिल साखरचंद काळे (वय ४५), पल्लवी अनिल काळे (वय ३५), संतोष सुदाम काळे (वय २९), नीलेश रुपचंद काळे (वय २७) बाळासाहेब साखरचंद काळे (वय ३१), रणजीत रुपचंद काळे (वय २८), अशोक बबन भोरडे (वय ३२), लंकाबाई रुपचंद काळे (वय ४५, सर्व रा. पिंपरी सांडस, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी वादातून घराच्या दिशेने दगडफेक केली. दांडक्याने मारहाण केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. सुनेला धक्काबुक्की करण्यात आल्याचे गुलाब श्रीराम यांनी परस्परविरोधी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×