Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

‘फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई

'फूटबोर्ड'वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई

पुणे-लोणावळा लोकलसेवेसाठी आदेश

marathinews24.com

पिंपरी – मुंबई उपनगर रेल्वेतील मुंब्रा-दिवा स्थानकावर सोमवारी झालेल्या दुर्घटनेनंतर असुरक्षितरित्या रेल्वे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापार्श्वभूमीवर पुणे-लोणावळा लोकलसेवेत ‘फूट बोर्ड’वर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे उद्घाटन – सविस्तर बातमी 

मंगळवारपासूनच ह्या आदेशाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘आरपीएफ’द्वारा विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नियमभंग करणाऱ्या रेल्वे प्रवाशांवर जागेवरच कारवाई केली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा बलच्या (आरपीएफ) आयुक्त प्रियांका शर्मा यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. रेल्वे कायद्याच्या १५६व्या कलमानुसार ही कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.

मुंबईतील रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे प्रशासन ही विशेष मोहीम राबवित आहे. यासाठी ‘आरपीएफ’च्या जवानांना लोकलमध्ये गस्त घालण्याची सूचनाही देण्यात आली आहे. यासह पुणे-लोणावळा दरम्यान असलेल्या विविध स्थानकांपाशी प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जाईल. धावत्या गाड्यांच्या दारात प्रवासी उभा असल्यास प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करताना रेल्वेच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘फूट बोर्ड’वर उभे राहून प्रवास करणे हा रेल्वे नियमाचा भंग आहेच, सोबत यातून प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे संबंधित प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे ‘आरपीएफ’च्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियांका शर्मा यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×