Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे उद्घाटन

कल्पना चावला स्पेस अकॅडमीचे उद्घाटन

यशाचा मार्ग शोधण्यासाठी दूरदृष्टी असणे महत्त्वाचे – शास्त्रज्ञ भारतभूषण जोशी 

marathinews24.com

पुणे – यशाचा मार्ग शोधण्यासाठी दूरदृष्टी असणे महत्त्वाचे आहे. अशी दूरदृष्टी प्रयत्नांनी विकसित होते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले.

पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा – सविस्तर बातमी 

ते विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टने सुरू केलेल्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी ॲड. माधव भोंडे (संस्थेचे अध्यक्ष), नारायण भार्गव (उपाध्यक्ष), इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ प्रा. जगदीशचंद्र मठ, राजेंद्र चतुर्वेदी, शिक्षणाधिकारी सुनील पोटे, अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जोशी म्हणाले की, विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी मानवाला अजूनही विश्वातील केवळ पाच टक्के माहिती ज्ञात आहे. उर्वरित माहिती शोधण्याचे काम युवा शास्त्रज्ञांचे आहे. नारायण भार्गव यांनी सांगितले की, अंतराळ विज्ञानात भारत तिसऱ्या क्रमांकावर असून लवकरच पहिल्या स्थानी येईल.

अंतराळ वैज्ञानिक घडवण्यासाठी स्थापन झालेल्या या अकादमीमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रा. जगदीशचंद्र मठ यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली. राजेंद्र चतुर्वेदी यांनी अकादमीतील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य असल्याची ग्वाही दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×