Breking News
पुण्यातील कात्रज भागात ३ बांगलादेशी घुसखोरांना पकडलेपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदलीअनैतिक संबंधातून बेदम मारहाण करुन पत्नीचा खूनपुण्यात तब्बल १२५ कोटींवर जमिनीसाठी अशीही बनवाबनवीगावनिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा-तहसीलदार गणेश शिंदेवारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- तहसीलदार गणेश शिंदेसौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवारसंगीत रजनीच्या तिकिट विक्रीतील रक्कम परत न करता फसवणूकरिक्षा प्रवाशाला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटकरखवालदाराच्या डोक्यात गज मारून खुनी हल्ला

‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’तर्फे संकल्पित वानखेडे स्टेडियमवरील स्टँडच्या नामकरण सोहळ्यात उपस्थित क्रिकेटरसिकांना संबोधित 

खासदार शरद पवार यांची भावना

marathinews24.com

मुंबई – मुंबई क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव ज्यांनी जागतिक पातळीवर ते सगळे ह्या ठिकाणी उपस्थित असलेले नामवंत खेळाडू, मुंबई क्रिकेट असोशिएशनचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि मित्रहो…आज एक छोटासा पण एक अतिशय आगळा वेगळा सोहळा आयोजित केला गेला आहे.

वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी- तहसीलदार गणेश शिंदे – सविस्तर बातमी

हे स्टेडियम वानखेडे साहेबांच्या नावाने आहे. मला आठवतंय, त्या काळामध्ये मी क्रीडा खात्याचा मंत्री होतो. हि जागा देण्यापासून ते स्टेडियम उभं करण्यापर्यंत वानखेडेंचे कष्ट होते आणि आम्हा सर्वांची त्यांना साथ होती. त्यामध्ये काही नामवंत क्रिकेट खेळाडू ह्यांचं योगदान मोठं होतं. यामध्ये पॉली उमरीगर आणि त्यांच्या त्या काळातले सहकाऱ्यांचं स्मरण प्रकर्षाने करावं लागेल. ह्या स्टेडियमचा एक इतिहास आहे.

एका मॅचमध्ये निर्णयावरून मतभेद झाले आणि त्याचा परिणाम काय झाला तर क्रिकेटच्या संबंधी आस्था असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राऊंडमध्ये शिरले. नंतर त्यांनी स्टेडियमलाही लक्ष्य केलं आणि हे स्टेडियम उध्वस्त केलं. त्यावेळेला साहजिकच पुन्हा एकदा हे स्टेडियम उभं करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोशिएशनवर पडलं. पण आनंद आहे कि, मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योगसमूहांनी आवश्यक आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम हे स्टेडियम वर्ल्ड कप सुरु होण्याआधी आपण उभं करू शकलो.

स्टेडियम उभं राहिलं आणि आजमितीपर्यंत खेळासंबंधीचं कर्तृत्व आपले खेळाडू दाखवतच आहेत पण प्रश्न आला ह्यानिमित्ताने काही सहकाऱ्यांचं स्मरण कायम कसं राहील ह्याची काळजी घ्यायची. म्हणून विजय मर्चंट असतील, सुनील गावस्कर असतील, दिलीप वेंगसरकर असतील, रवी शास्त्री असतील आणि अन्य नामवंत क्रिकेटीअर्स ज्यांचं योगदान ह्या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं. ज्याची नोंद अभिमानाने मुंबईने करावी म्हणून त्यांचं काही ठिकाणी स्टॅण्ड नामकरणाचा निर्णय घेतला. हाच धागा पकडून आणखी आपण नवीन उपक्रम हातामध्ये घेतोय. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून रोहितचं नाव ह्या देशातील तरुण पिढीच्या मनामनात आहे, क्रिकेट रसिकांच्या घराघरात पोहोचलेलं आहे.

हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं, कष्टानं आणि उत्तम खेळानं निर्माण झालं आहे आणि हे मुंबईकरांनाही अभिमान वाटणारं आहे. त्याची आठवण कायम रहावी म्हणून स्टॅण्डला नाव देण्याचा उपक्रम घेतला जातोय ह्यास्तही मुंबई क्रिकेट असोशिएशन ह्या संस्थेचा मी आभारी आहे.

आणखी दोन-तीन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ज्या येत्या काही दिवसात पूर्ण होतील. एक म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं क्रिकेटचं म्युझिअम, ते आपल्याला इथे उभं करायचंय. त्याच्या कामाची सुरुवात झालेली आहे. सबंध मुंबई क्रिकेटचा इतिहास त्या म्युझिअममध्ये असेल. त्या इतिहासामध्ये ज्या नामवंत व्यक्तींनी देशाचा, मुंबईचा नावलैकिक वाढवला त्यासंबंधीची माहिती त्या म्युझिअममध्ये असेल आणि जो काही मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे, त्याचं दर्शन घेण्याची सुविधा क्रिकेट रसिकांना दिली जाईल. दुसरं म्हणजे, क्रिकेटचं एक नवीन शॉप असेल. जिथे ह्या खेळासंबंधीच्या अविस्मरणीय वस्तूंची विक्री केली जाईल.

माझी खात्री आहे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी ह्या बघितल्याच पाहिजे असं वाटेल. त्यांच्या पर्यटनाच्या दौऱ्यामध्ये हि सुद्धा एक गोष्ट असेल अशा दर्जाचं म्युझिअम इथे उभं राहील. म्हणून इथलं स्टेडियम, म्युझिअम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास हा पाहता येईल, अशी सुविधा आपण करतो आहोत. ही सगळी पावलं उचलताना, मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्षे निस्वार्थपणे काम करणारे, उत्तम प्रकारे क्लब चालवणारे आपले सर्व सहकारी आणि क्रिकेटपटू यांच्यासाठी हा एक अमूल्य खजिना कायमस्वरूपी उपलब्ध करून दिला जाईल, याची मला खात्री आहे. लोक त्याचं मनापासून स्वागत करतील.

आता ह्या सगळ्या नावांमध्ये स्टॅण्डसाठी माझंही नाव का घेतलं मला माहित नाही. मी सांगत होतो कि, हे फक्त क्रिकेटर्सपूर्ती मर्यादित ठेवा. पण नंतर त्यांनी त्यांची भूमिका विशद केली कि, ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून योगदान मोठं असतं आणि त्याबद्दलचाही सन्मान केला गेला पाहिजे, म्हणून मुंबई क्रिकेट असोशिएशनने हा निर्णय घेतला. मी त्यांचा आभारी आहे. त्यांना एवढंच सांगेन कि, आपला हा जो ऋणानुबंध आहे तो कायमचा राहील. ह्या संस्थेसाठी, ह्या वास्तूसाठी आणि ह्या खेळाडूंसाठी जे काही करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांवर असेल आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी आम्ही असो किंवा मुंबईमधला क्रिकेटप्रेमी असो कधीही मागे राहणार नाही, एवढाच विश्वास निश्चितपणे देतो. धन्यवाद !

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top