महाराष्ट्र वनविभाग आणि ‘दि ग्रासलँड्स ट्रस्ट’ यांच्यात झाला करार
marathinews24.com
पुणे – अधिवास पुनर्स्थापना आणि वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, महाराष्ट्र वन विभागाच्या पुणे व सोलापूर विभागांनी दि ग्रासलँड्स ट्रस्ट या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. अभयारण्यांच्या सीमा पलीकडील क्षेत्रांमध्ये अधिवास पुनर्स्थापनेच्या व्यापक उपक्रमांची अंमलबजावणी करणे आणि वन्यजीव संवर्धनासाठी उपाययोजना करण्यासाठी कराराद्वारे प्राधान्य देण्यात येणार आहे. हा करार उपवनसंरक्षक तुषार चव्हाण आणि दि ग्रासलँड्स ट्रस्ट चे संस्थापक मिहीर गोडबोले यांनी स्वाक्षरी करून केला. यावेळी सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे,अतुल जैनक, दीपक पवार, दि ग्रासलँड्स ट्रस्टचे निशांत देशपांडे उपस्थित होते.
आला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळा – सविस्तर बातमी
महाराष्ट्रातील गवताळ अधिवासाचे पुनरुज्जीवन, वन्यजीवांचा अधिवास संरक्षित करणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे ही वन विभागाची वचनबद्धता आहे,”असे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी सांगितले, त्यांनी संबंधित भागातील वन्यजीव संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.दि ग्रासलँड्स ट्रस्टचे मिहीर गोडबोले म्हणाले, “संरक्षित क्षेत्राबाहेरील वन्यजीवांचे संरक्षण करणे व गवताळ प्रदेश पुनर्स्थापनेचे एक पुनरुत्पादनीय मॉडेल निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, जे जैवविविधतेच्या संवर्धनाबरोबरच स्थानिक समुदायांसाठी शाश्वत उपजीविकेची संधी निर्माण करेल असे सांगितले.