पुण्यात बेशिस्त चालकांवर एआय कॅमेरा वाहनांचा वॉच

पुण्यात बेशिस्त चालकांवर एआय कॅमेरा वाहनांचा वॉच

मोबाईल वाहनांद्वारे होणार जागेवरच इ-चलान

marathinews24.com

पुणे – पुण्यात बेशिस्त चालकांवर एआय कॅमेरा वाहनांचा वॉच –  बेशिस्त वाहन चालकांना वळण लावण्यासाठी पुणे पोलिसांकडून आता एआय कॅमेरा असलेल्या वाहनांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्यानुसार संबंधितांविरूद्ध जागेवरच दंडात्मक कारवाई केली जाणार असून, इ-चलान पाठविले जाणार आहे. त्यासोबतच संबंधित वाहनाद्वारे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हद्दीत गस्तीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आयुक्तालयात उपक्रमाचे उदघाटन केले. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, एसीपी नंदिनी वग्याणी उपस्थित होते.

गँगस्टर अरुण गवळीचा पीए असल्याची बतावणी, ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक – सविस्तर बातमी 

प्रुफ ऑफ कन्सेप्टच्या धर्तीवर एआय कॅमेरे बसविलेली पोलीसांची वाहने ठिकठिकाणच्या रस्त्यांवर गस्त घालणार आहेत. त्याद्वारे नियमभंग करणार्‍या वाहन चालकांना क्रमांकाद्वारे ट्रॅक करीत इ-चलान पाठविले जाणार आहे. त्यामुळे ठराविक ठिकाणी बसविलेल्या एआय कॅमेर्‍यांचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. परिणामी वाहतूक नियमभंगाचे प्रमाण जास्त असलेल्या मार्गावर नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. दरम्यान, वाहतूक नियोजन व नियंत्रणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी हस्तक्षेप कमी करणे, पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, वाहतूक प्रवाह सुलभ करण्याचा प्रकल्पाचा उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यात बेशिस्त चालकांवर एआय कॅमेरा वाहनांचा वॉच

फर्ग्युसन रस्ता परिसरात वाहतूक विभागाने प्रायोगिक तत्वावर एआय आधारीत कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे नागरीकांना वाहतूक कोंडीमुक्त रस्ता उपलब्ध होत आहे. एआय सक्षम कॅमेरे, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे अधिक प्रभावी होत असल्यामुळे नागरिकांची कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यांत फर्ग्युसन रस्त्यावर नो पार्विंâगमध्ये वाहने उभी करणार्‍या १ हजार ३३५ जणांवर कारवाई केली आहे. दुर्तफा पार्विंâग करणारे १ हजार ८८६, राँगसाईड ७१९, ट्रीपल सीट ४२, ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलणारे ९ असे मिळून ३ हजार ९४९ बेशिस्तांविरूद्ध कारवाई केली आहे. त्यामुळे संबंधित चालकांवर परिणाम झाला असून, केसेसपैकी फक्त १ टक्का चालकांनी त्याचठिकाणी पुन्हा नियमभंग केला होता.

तर गस्त वाहनांवर एआय कॅमेरे बसवले जाणार

मोबाईल अ‍ॅपद्वारे नागरिकांचे सहकार्य मिळवून पोलीसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच एआय कॅमेर्‍यांद्वारे वाहतूक नियमभंगाची पूरावा आधारीत कारवाई शक्य होणार आहे. नियमभंगाची कारवाई वेगाने होण्यास मदत होऊन, पोलीस व नागरिकांमधील वाद टाळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यास पोलीसांच्या सर्व गस्ती वाहनांवर एआय कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्यानुसार वाहतूक नियमभंगाची कारवाई केली जाणार आहे.

वाहतूक नियोजनासाठी आम्ही प्राधान्य दिले असून, विविध योजना-उपक्रमांद्वारे बेशिस्तांविरूद्ध कारवाईसह नागरिकांची कोंडीतून सुटका करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आता मोबाईल अ‍ॅपसह एआय कॅमेरा सज्ज असलेल्या वाहनांमुळे कारवाईचा वेग वाढणार आहे. तसेच वाहतूक विभागाव्दारे आयटीएमएसचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×