गँगस्टर अरुण गवळीचा पीए असल्याची बतावणी, ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक

गँगस्टर अरुण गवळीचा पीए असल्याची बतावणी, ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक

लष्कर पोलीस आणि खंडणीविरोधी पथकाची कारवाई

marathinews24.com

पुणे – कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याचा पी ए बोलत असल्याची बतावणी करीत बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीचा लष्कर पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथक एकने पर्दापाश केला आहे. रोहन शिवाजी गवारे (वय ३० कोरेगाव पार्क) सुदर्शन आसमानराव गायके (वय २७, संभाजीनगर) महेंद्र रामनाथ शेळके (वय ४२, बीड) कृष्णा परमेश्वर बुधनर (वय २६, बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.आरोपीनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

पुण्यात जिगरबाज पोलिसांनी बुडणाऱ्या तरुणीला वाचविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून, २८ जुलैपासून आरोपींनी त्यांना फोन करून धमकी देण्यास सुरुवात केली. मी अरुण गवळीचा पी.ए. बोलतोय’ अशी बतावणी करून धमक्या देत पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. ४ ते ११ ऑगस्ट कालावधीत टोळक्याने त्यांना ऑफिसमध्येच धमक्या देत ५ कोटींची मागणी केली होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढून अटक केली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त निखिल पिंगळे, उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राजेंद्र मुळीक, एसीपी संगिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक शैलेश संखे पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, एपीआय विशाल दांडगे, एपीआय राजेश माळेगावे, उपनिरीक्षक वैभव गायकवाड उपनिरीक्षक राहुल घाडगे यांच्यासह पथकाने केली. गँगस्टरचा पी ए असल्याची बतावणी करीत बांधकाम व्यावसायिकाला ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या टोळीला अटक केली आहे. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×