फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्यावतीने (एफसीआय) सत्कार समारंभ
marathinews24.com
पुणे – एअर मार्शल प्रदीप बापट(निवृत्त) यांची मेस्कोच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने (एफसीआय) एअर मार्शल प्रदीप बापट पीव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त ) यांचा सत्कार करण्यात आला. सोमवारी (दि. ७) हॉटेल ग्रँड शेरेटनमध्ये कार्यक्रम पार पडला. राज्यपालांच्या मान्यतेने एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांची महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमेन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (मेस्को) संचालक मंडळावर संचालक नियुक्ती केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे (एफसीआय) अध्यक्ष शिव हरी हालन यांनी भूषवले. बेलराईज इंडस्ट्रीजच्या सुप्रिया बडवे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
विद्यार्थी हितासाठी फाउंडेशन कार्यरत राहणार- ऍड अनुजा पाटील – सविस्तर बातमी
यावेळी एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त),एअर कमोडोर अरुण इनामदार, ग्रूप कॅप्टन महाबळेश्वर देशपांडे, विनोद जैन, मुकुंद पुराणिक, विनोद बन्सल, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरासह ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया बडवे यांनी भारतीय हवाई दलातील एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांच्या गौरवशाली कारकिर्दीतून मिळालेल्या अनुभव आणि कौशल्याच्या समृद्धतेबद्दल माहिती दिली.बडवे यांनी सांगितले की,सेवेतील त्यांच्या समर्पणामुळे आणि उत्कृष्टतेसाठीच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे त्यांना एअर मार्शलच्या सन्माननीय पदासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून,फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने (एफसीआय) एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त) यांचा महाराष्ट्र आणि गोवाच्या पूर्व सैनिक परिषदेतील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजला (एफसीआय) त्यांनी दिलेल्या मौल्यवान पाठिंब्याचे वर्णन करणारे सन्मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध रेखाचित्रकार मिलिंद रथकंठीवार यांनी एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त ) यांचे पोर्टेट चित्र भेट दिले. एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांच्या ह्या महामंडळावरील नियुक्तीमुळे विविध सर्व्हिसमधील माजी सैनिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील अशी अपेक्षा आहे. एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त) यांनी सत्काराला उत्तर देताना माजी सैनिकांच्या सर्वकष कल्याणासाठी ही जवाबदारी मी स्वीकारली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. माजी सैनिकांकरिता यथाशक्ती अधिक काही करण्याचा पवित्र हेतू यावेळी व्यक्त केला.