गायी वासरांची चळवळ घेऊन जाणारे गोरक्षक अक्षय कांचन यांची पुणे शहर जिल्हाध्यक्षपदी निवड
marathinews24.com
पुणे – गौरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचीत मागील ६ वर्षे गोरक्षा सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक म्हणून कार्यरत असणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कर्तृत्वाने गायी वासरांची चळवळ घेऊन जाणारे गोरक्षक अक्षय कांचन यांची पुणे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी मानद पशुकल्याण अधिकारी आणि संस्थेचे उपाध्यक्ष राहुल कदम यांनी पुढाकार घेऊन गोरक्षक अक्षय कांचन यांना जिल्हाध्यक्ष पदासाठी कार्यभाग वाढवण्याचे दायित्व दिले.
वाचनसंस्कृती जनजागृतीसाठी पुणे- कुर्डुवाडी सायकलवारीचे आयोजन – सविस्तर बातमी
मराठवाडा गोरक्षा कार्य समन्वयक आकाश संजय भैसडे यांनी सांगितले की, सहकारी गोरक्षक म्हणून अक्षय कांचन वारंवार उत्तमरित्या प्रशासनाला धरून कार्य करत आहेत. येत्या काळात ‘गोहत्यामुक्त पुणे’ हा ‘अजेंडा’ ठेवून गोरक्षक श्री. अक्षय कांचन पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कार्यरत रहातील. हा विश्वास ठेवून त्यांना यासाठी शुभेच्छा देतो, असे सांगितले. दरम्यान, गोरक्षा करण्यासाठी सातत्याने प्राधान्याने काम करणार असल्याचे कांचन यांनी सांगितले आहे.