पाषाण सुस रोडवरील हाय प्रोफाइल सोसायटीतील घटना
marathinews24.com
पुणे – लहान मुलांमधील किरकोळ भांडणाचा वाद थेट कुटूंबियापर्यंत पोहोचला. त्यामुळे दोन्ही कुटूंबियात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना पुण्यातील पाषाण सुस रस्त्यावरील हाय-प्रोफाईल सोसायटीत घडली आहे.ही घटना १२ मे ला सकाळी १० वाजता घडली. मारहाण, गैरवर्तन आणि धमक्याप्रकरणी दोन्ही कुटूंबियाविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अर्चना प्रेमचंद संग (वय ४८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा ११ वर्षांचा मुलगा सोसायटीच्या मैदानात खेळत होता. शेजारच्या मुलांनी त्याच्या मुलाला तिथे खेळू न देता हाकलून लावले. जेव्हा तिच्या मुलाने येऊन आईला सांगितले तेव्हा अर्चना मुलाला घेऊन खाली पोहचली. मुलांशी बोलू लागली असता संबंधित मुलाने वाद घालायला सुरुवात केली. इथे फक्त आम्हीच खेळतो, तुमचा मुलगा इथे खेळू शकत नाही असे सांगितले. दरम्यान, आयटी व्यावसायिक रणजीत संग (वय ५२) घटनास्थळी धाव घेत त्यांनी शेजारच्या मुलांना मागे ढकलले. त्यानंतर त्याने वडील संतोष कुलकर्णी यांना बोलावले. त्यांनी हातातील बॅटने अर्चनाच्या पायावर हल्ला करून तिला जखमी केले. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तीन जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.
अलका कुलकर्णी यांनी रणजीत संग आणि अर्चना संग यांच्याविरुद्ध दुसरा एफआयआर दाखल केला आहे. अलकाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे दोन्ही नातू खेळत असताना शेजारचा ११ वर्षांचा मुलगा तिथे खेळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने शेजारच्या मुलाला नंतर इथे खेळायला सांगितले, त्यानंतर तो घरी गेला आणि त्याच्या पालकांना फोन केला. त्यामुळे अर्चनाने येऊन रागाच्या भरात मुलांची खेळणी फेकून दिली.
त्यानंतर रणजीतने नातवाला बॅटने मारले ज्यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली. अलकाने विरोध केला तेव्हा अर्चनाने तिला चापट मारत शिवीगाळ केली. संतोष कुलकर्णीने रणजीत संगला विचारले की तू मुलाला का मारतोस, तेव्हा रणजीतने त्याला धमकावले आणि हाताने मारहाण केली. बाणेर पोलिस ठाण्यात दोन्ही एफआयआर नोंदवल्यानंतर, तपास पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके यांच्याकडे सोपवला आहे.