Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

“सुरांनी जग जिंकणाऱ्या आशाताई भोसले यांना भावपूर्ण निरोप

“सुरांनी जग जिंकणाऱ्या आशाताई भोसले यांना भावपूर्ण निरोप

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले पार्थिवाचे दर्शन

marathinews24.com

मुंबई – ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवाचे आज विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शिवसेना चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार आणि शिवसेना प्रवक्त्या शायना एन सी उपस्थित होत्या.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन – सविस्तर बातमी 

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “लहानपणापासून अनेक दशकांपर्यंत आशाताईंनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘या डोळ्यांची दोन पाखरे’, ‘ऋतू हिरवा’ यांसारख्या असंख्य अजरामर मराठी गीतांपासून ते हिंदी, ओडिया, तमिळ, गुजराती, आसामी अशा विविध भाषांमधील गाण्यांद्वारे त्यांनी भारतीय संगीतसृष्टी समृद्ध केली. भक्तीगीत, प्रेमगीत, विनोदी तसेच उडत्या चालीतील नृत्यगीतांपर्यंत प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली वेगळी छाप उमटवली. त्यांचा आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय चांगला स्नेह होता. कला, साहित्य आणि देशभक्ती या विषयांवर त्यांच्यात अनेकदा संवाद होत असे,” असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, “आशाताई अनेक वेळा शिवसेनेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या होत्या. माझाही त्यांच्याशी परिचय झाला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात त्यांनी शिंदे यांचे कौतुक करत ‘शिवसेना तुम्ही पुढे नेत आहात’ असे म्हणत आशीर्वाद दिले होते.”

“मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशाचा गौरव वाढवणाऱ्या आशाताई भोसले यांचे योगदान अजरामर आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,” असे सांगत त्यांनी दिवंगत आशाताईंना विनम्र अभिवादन केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×