Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन

अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन 

marathinews24.com

पुणे – श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे ( वय ६०, रा. कोथळे, पुरंदर) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील, तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१३) रात्री कोथळे गावी अंत्यविधी होणार आहे. भोईटे यांनी पुढारी, देशदूत, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते.

पिस्तूल बाळगणार्‍या सराईताला पकडले – सविस्तर बातमी 

शेतकरी संघटनेचे ते नेते होते. जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य होते. जिल्हा परिषदेच्या शाळा मूल्यांकन तपासणी समितीचे सदस्य होते. त्यांना संत गाडगे बाबा ग्रामस्वछता अभियानाचे उत्कृष्ट वार्ताकांनाचे पारितोषिक व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियाननाचे उत्कृष्ट वार्ताकनाचे पारितोषिक मिळाले होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात आंदोलने केली. शेतकरी आंदोलनात त्यांना कारावास भोगावा लागला होता. ‘केसरी’चे विश्वस्त- सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक व ‘केसरी’ च्या विश्वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×