लोहियानगरमध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
marathinews24.com
पुणे – शहरातील गंज पेठेतील लोहियानगर परिसरात दहशत माजविणारा गुंड अभिषेक ससाणे याच्याविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले.
“येरवडा कारागृहातील बंद्यांचे आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत यश – सविस्तर बातमी
लोहियानगर भागातील अभिषेक ऊर्फ बुचड्या देवीदास ससाणे (वय २२, रा. लोहियानगर) याच्याविरुद्ध खडक आणि लष्कर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदा शस्त्र बाळगून जिवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ससाणेच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती.
तो नागरिकांना दमदाटी करणे, शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे, शस्त्राचा धाक दाखवुन लूटणार, प्रतिकार केल्यास हल्ला करणे असे प्रकारचे गुन्हे तो करत होता. त्याच्या दहशतीमुळे लोहियानगर भागातील नागरिक आणि व्यापारी पोलिसांकडे तक्रार देण्यास घाबरत होते.ससाणेविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तयार केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना प्रस्ताव सादर करण्यात आला.
पोलीस आयुक्तांच्या आदेशाने ससाणे यालावर्धा मध्यवती कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, तत्कालिन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लांडे, सहायक निरीक्षक हर्षल कदम, हवालदार संतोष बोरात, पोलीस शिपाई चंद्रशेखर खरात, इरफान नदाफ, देवकर, लांडगे यांनी ही कारवाई केली.