Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

अनुलोमच्या वतीने संविधान विषयक कार्यक्रम उत्साहात संपन्न

भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्त “आपल्या संविधानाची पंचाहत्तरी विशेष” कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

धाराशिव – कल्याणराव भातलवंडे हायस्कूलमध्ये अनुलोम संस्थेच्या वतीने भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्ती निमित्त “आपल्या संविधानाची पंचाहत्तरी विशेष” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात परांडा कोर्टात कार्यरत असलेले अॅड. निरंजन नागनाथ कोकणे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती दिली. त्यांनी व्हिडीओ, पीपीटी सादरीकरण आणि व्याख्यानाच्या माध्यमातून संविधानाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.

भक्त प्रल्हादराय आणि श्री राघवेंद्र स्वामी यांची भेट – सविस्तर बातमी 

प्रमुख वक्ते निरंजन नागनाथ कोकणे नामदेव यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत, संवादात्मक पद्धतीने संविधान समजून सांगितलं. विद्यार्थ्यांनीही प्रश्नोत्तर सत्रात उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात जनसेवक अक्षय देशमुख यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी ‘अनुलोम’ या संस्थेची माहिती दिली. विद्यार्थ्यांना संविधानाविषयीची प्रश्नावलीही भरून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. या वेळी अनुलोम मित्र कृष्णा चौधरी, समाधान आलदर तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×