मोशीतील मुलींसाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू
marathinews24.con
पुणे – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पिंपरी-चिंचवड मोशी या संस्थेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ आदी प्रवर्गातील ११ वी, बिगर व्यवसायिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभाकरीता बँक तपशील भरण्याचे – आवाहन –सविस्तर बातमी
पुणे– शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश व कॉलजचे ड्रेसकोड इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरहा ९०० रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शैक्षणिक साहित्य भत्ता ४ हजार रुपये, छत्री, रेनकोट, गमबूट भत्ता ५०० रुपये, गणवेश भत्ता २ हजार रुपये, प्रकल्प (प्रोजेक्ट) भत्ता १ हजार रुपये आदी देण्यात येते. शिवाय संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडासाहित्य आदी अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.
विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतू पुणे, पिंपरी-चिंचवड मोशी प्राधीकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. प्रवेशासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयाचा बोनाफाईड दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड (मुलीचे व पालकांचे), शिधापत्रिका सोबत आणाव्यात. वसतीगृह प्रवेश https://hmas.mahaait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अधिक माहितीसाठी २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पिंपरी-चिंचवड मोशी (भ्र. ध्व. क्र. ७७७४००१९२६ आणि ७५०७५९०६४७) येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी केले आहे.