Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत सौर उर्जेव्दारे कृषी पंप विद्युतीकरण करण्याचे आवाहन

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार

marathinews24.com

पुणे – शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान कुसुम-बी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत ३ एचपी, ५ एचपी व ७.५ एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती महाऊर्जा पुणे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी दिली.

जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक – अपर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश – सविस्तर बातमी 

सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. यासंदर्भात पात्र शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविला जातो.

महाऊर्जामार्फत आतापर्यंत पुणे जिल्ह्यात सुमारे ८,२०५ सौर कृषी पंपांची स्थापना करण्यात आली आहे. नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B तसेच https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्ज नोंदणीपासून कागदपत्रे अपलोड करणे, अर्ज छाननी, लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, ऑनलाईन हिस्सा भरणे व पुरवठादार निवडणे या सर्व सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी महाऊर्जा मार्फत खोटे एसएमएस प्राप्त झाल्यास अशा संदेशांपासून सावध राहावे आणि फसवणुकीपासून बचाव करावा, असेही आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×